आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾कसाल पंचक्रोशीत दुरध्वनी सेवा विस्कळीत..

 

◾वीज गायब झाल्याने मोबाईल झालेत ‘स्विच आॕफ..            

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल, दि-१८ :- तौक्ती वादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यासह किनारपट्टीच्या सर्वच भागाला बसला असून कुडाळ तालुक्यातील कसाल या गावी गेले चार दिवस बी. एस. एन. एल ची दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे संपर्क यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे. तर वीज गायब झाल्याने अनेकांचे मोबाइलही स्विच ऑफ झाले आहेत.

कसाल पंचक्रोशीतील काही गावांना तौक्ती वादळाचा फटका बसला असून काहींची घरे, गोठे वादळाच्या तडाख्याने कोलमडून पडले आहेत. तर काहींच्या आंबा, काजू बागांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे काही ठिकानी वीज पोल मोडून पडलेत. तर काही ठिकाणी वीज तार तुटून खाली पडल्या आहेत. यामुळे गेले चार दिवस नागरिक अंधारात जगत आहेत.

तसेच भारतीय दूरसंचार निगमच्या सर्व्हिसने कहर केला असून गेली 4 ते 5 दिवस कसाल बाजारपेठेत व पंचक्रोशीत नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तर सरकारी कार्यालये, बँका यांना नेट नसल्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. तर वादळामुळे आणि संपर्क यंत्रणेच्या अभावामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!