Tuesday, August 11, 2026
Latest:
आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडीच्या आठवडा बाजारपेठेत आज पावसासाठी लागणाऱ्या प्लास्टीक खरेदी व इतर सामानासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.१८- सावंतवाडीच्या आठवडा बाजारपेठेत आज पावसासाठी लागणाऱ्या प्लास्टीक खरेदी व इतर सामानासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

तौक्ते चक्री वादळाबरोबर कोसळलेल्या पावसामुळे लोकांच्या घराचे छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वाऱ्याने घराचे पत्रे उडून गेले आहेत.

मे महिन्यात नवीन छप्पर बनविणे, जुन्या छप्पराची डागडूजी करणे आदी कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. पण ऐन त्याचवेळी पाऊस पडल्याने छप्पर उघडे पडले आहे. त्यामुळे तात्पुरते छप्पर धाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात प्लास्टीक खरेदी लोकांची गर्दी होत आहे. मान्सूम पावसावेळी दरवर्षी पावसासाठी लागणाऱ्या सामानासाठी अशी गर्दी होत असते. पण यंदा मे महिन्यातच कोसळलेल्या पावसामुळे आतापासूनच बाजारपेठेत गर्दी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!