आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾फोन उचलू नका निदान ग्राहकांशी सौजन्याने वागा..

 

◾माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विज अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि १८:- चक्रीवादळानंतर सावंतवाडीतील परिस्थिती सुधारण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सपशेल अयशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असलेले बरेच कर्मचारी साधा फोन उचलण्याचे सौजन्य दाखवत नाही, त्यामुळे वीज पुरवठा सोडा, किमान सौजन्याने फोन तरी उचला, अशा कानपिचक्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वीज अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान विज सेवेतील सुसूत्रता आणण्यासाठी कायम तत्वावर कर्मचारी वीज मंडळात भरती करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. चक्रीवादळात सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र बऱ्याच भागात अद्यापपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेली नाही. अनेक नागरिक वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. परंतु तेथील अधिकारी उत्तर देत नाही, फोन उचलत नाही, त्यामुळे नागरिक नाराज आहेत. याबाबत नाराजी त्यांनी श्री.साळगावकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर खुद्द साळगावकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत परंतु कार्यालयात कोणी अधिकारी भेटले नाही, त्यांना फोन केला असता त्यांनी फोनही उचलला नाही. याबाबत श्री साळगावकर यांना नाराजी व्यक्त केले आहे. वीज कंपनीचे झालेले नुकसान मान्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अधिकारी कामाला गेले असतील हे ही मान्य आहे. परंतु नागरिकांना विश्वास वाटण्यासाठी त्यांचे फोन उचलणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी सुरेश भोगटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!