◾गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सीजनची वाट बघत आज आणखी 13 कोरोनाग्रस्तांनी प्राण सोडला..

 

◾ऑक्सीजन पुरवठ्याबाबत 7 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे गोवा सरकारला उच्च न्यायालयाने दिले आदेश..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴गोवा, दि-१४:- गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सीजनची वाट बघत आज आणखी 13 कोरोनाग्रस्तांनी प्राण सोडला. मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसात वेळेत ऑक्सीजन मिळाला नसल्यामुळे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तब्बल 74 जणांचा मृत्यू झालाय. याबाबत उच्च न्यायायलात आपली बाजू मांडताना गोवा सरकरने संतापजनक उत्तर दिलय. ऑक्सीजन घेउन येणारा ट्रॅक्टर मध्येच कुठेतरी अडकल्यामुळे ऑक्सीजन हॉस्पिटल पर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही असं कारण गोवा सरकारने न्यायालयात दिलय. गोवा सरकारच्या या हलगर्जीपणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. आज संध्याकाळी (शुक्रवार 14 मे ) 7 वाजेपर्यंत ऑक्सीजन पुरवठ्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने गोवा सरकारला दिले आहेत.

सरकारची बेफिकीरी उठली जनतेच्या जिवावर

 

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये बसवण्यात आलेली ऑक्सीजन यंत्रणा मॅन हंडलींगची आहे. त्यामुळे ऑक्सीजन सिलिंडर वेळेतच बदलावे लागतात. शुक्रवारी ( 14 मे ) मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 13 जणांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. त्या आधी गुरुवारी सकाळी 15 जणांचा मृत्यू झाला. त्या आधी बुधवारी 20 जण ऑक्सीजनअभावी दगावले तर त्या आधी म्हणजे मंगळवारी मध्यरात्री 2 ते सकाळी 6 पर्यंत 26 रुग्ण दगावले. असे एकूण 74 मृत्यू या चार दिवसात ऑक्सीजन अभावी झाले आहेत

 

थातूर – मातूर कारणे देउ नका – न्यायालयाने फटकारले

 

गोवा सरकारने दिलेल्या ट्रॅक्टर बिघडल्याच्या कारणावर उच्च न्यायालयाने सरकारला कडक शब्दात झापलय. ही असली कारण देउन तुम्ही जबाबदारीपासून दूर पळू शकत नाही . ट्रॅक्टर मिळाला नाही, टेक्नीशियन मिळाला नाही, ड्रायव्हर आला नाही ही काय कारणं आहेत का ? तुमच्या राज्यात लोक मरतायत आणि तुम्ही असली कारणं देत बसता हे अजिबात मान्य नाही . संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑक्सीजन पुरवठ्याची आणि अन्य काय व्यवस्था केली आहे याचा अहवाल न्यायालयाला सादर करा असे आदेश हायकोर्टाने गोवा सरकारला दिले आहेत

सरकारची बेफिकीरी उठली जनतेच्या जिवावर

 

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये बसवण्यात आलेली ऑक्सीजन यंत्रणा मॅन हंडलींगची आहे. त्यामुळे ऑक्सीजन सिलिंडर वेळेतच बदलावे लागतात. शुक्रवारी ( 14 मे ) मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 13 जणांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. त्या आधी गुरुवारी सकाळी 15 जणांचा मृत्यू झाला. त्या आधी बुधवारी 20 जण ऑक्सीजनअभावी दगावले तर त्या आधी म्हणजे मंगळवारी मध्यरात्री 2 ते सकाळी 6 पर्यंत 26 रुग्ण दगावले. असे एकूण 74 मृत्यू या चार दिवसात ऑक्सीजन अभावी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!