◼️पोलिसांचे खरे पालकत्व स्वीकारलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलीस खात्यासाठीचे कार्य अविस्मरणीय : सैफ सुर्वे
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-१२ :- निवडणूक असो वा कोरोना सारखे भयंकर संकट याला तोंड देण्याच काम पोलीसच्या खांद्यावर होते व त्या खाकी मधील जवानांचे व त्याच्या परिवाराचे पालकत्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतले होते त्याचे साक्षीदार महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले वारंवार त्यांचा संपर्कात राहून, त्यांची गाठ-भेट घेऊन पोलिसांचे अनेक प्रश्न दुबाले यांनी मार्गी लावल्याचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
कडक लॉक डाउन मध्ये प्रत्येक सीमेवर असणाऱ्या पोलीस परिवार यांच्या जवळ जाऊन त्यांना काय हवे नको ते विचारले. शहीद पोलीस परिवार यांच्या घरी जाऊन सांत्वन केले कोरोनाच्या आजाराशी घाबरू नका तुम्ही जनतेची काळजी घेतात मी तुमची काळजी घेतो हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे शब्द व ते सत्यात पण उतरवले. त्यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही पोलीस परिवार यांच्या साठी राज्य भर काम करते त्यांचे प्रश्न वारंवार जाणून घेऊन त्याला अंमलबजावणी केली पोलीस यांच्या हिता साठी संघटनेने केलेली प्रत्येक मागणी देशमुख साहेबांनी विलंब न लावता ती पूर्ण केली. ५० लाखाचा विमा, कोरोनाच्या आजार पोलीस प्लॅन मध्ये समाविष्ट, ट्राफिक कर्मचारी यांची सुरक्षा ,५५ वर्षा वरील कर्मचारी यांना घरी राहण्याचा आदेश, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या साठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल ची निर्मिती , पोलीसच्यासाठी स्वतंत्र अंबुलन्स सेवा, अनुकंपाच्या मुलांना नियुक्त्या ,जिथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बेड मिळत नसेल तर स्वतः त्याला बेड मिळेपर्यंत पर्यंत प्रयत्न करणे, या गोष्टीचा साक्षीदार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आहे असेही सैफ सुर्वे म्हणाले. कोरोनाच्या काळात जनता दरबार च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या परिवाराला त्यांच्या माध्यमातून अडचण सोडवण्याचे खुले व्यासपीठ देशमुख यांनी दिले, कोरोना ची लागण झाली असतांना उपचार घेत असताना प्रत्येक पोलीसासाठी रुग्णालयातून काम केले, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडली. आमच्या मनात तुम्ही कायम घर करून राहणार व आम्ही आपले ऋण कधी ही फेडू शकणार नाहीत. आता च्या कोरोनाच्या आजाराला पोलीस अधिकारी कर्मचारी जोमाने तोंड देत आहे, पण आपली उणीव अधिक भासते असे कधी कधी वाटते की कर्तव्य करत असताना चौकात वायरलेस वर संदेश येतो का काय, गृहमंत्री अनिल देशमुख येथे येणार लगेच मनात आपले प्रश्न घेऊन त्यांच्या समोर उभा राहण्याची इच्छा वाढते पण नंतर कळते पदावर नसले तरी काय झाले आता पण आमचे कामे करतात याचा अनुभव महाराष्ट्रातील पोलीस परिवारानी घेतला आहे व विश्वास आहे. महाराष्ट्रातील पूर्ण पोलीस परिवार व पोलीस बॉईज आपल्या कधीच विसरणार नाहीत कायम सोबत राहणार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या मनातील तुम्हीच गृहमंत्री कायम राहणार असा विश्वास सैफ सुर्वे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी व्यक्त केला आहे.