आरोग्यसामाजिकसावंतवाडी

घाबरुन घरात राहू नये;लक्षणे आढळल्यास लगेचच कोरोना तपासणी करुन घ्या

 

कोलगांवातील वाढती कोरोना रुग्ण संख्येची साखळी तोडण्यास सहकार्य करा-सरपंच संतोष राऊळ

🎴सावंतवाडी,दि.०७:- तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत,ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण खुप वाढत आहेत,मृत्यू चे प्रमाणही वाढत आहे.लक्षणे असताना घाबरुन राहून घरात राहणे,हलगर्जीपणा करणे ह्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोलगांव मध्येही कोरोनाचे रुग्ण आढळत आहे मात्र प्रत्येकाने आपली काळजी घेण गरजेचे आहे,कोणतीही लक्षणे आढळल्यास लगेचच आपली कोरोना तपासणी करणे काळाची गरज आहे,घाबरुन घरात राहून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा,वेळीच आपली तपासणी करुन घ्या,मनात कोणतीच भिती बाळगू नका लक्षणे असल्यास स्वतःहून पुढे या असे आवाहन कोलगांव सरपंच संतोष राऊळ यांनी केले आहे.तसेच गरज असेल तरच घरा बाहेर पडा,कोलगांवात वाढलेल्या कोरोनारुग्णांची साखळी तोडून आपण लवकरच आपले कोलगांव कोरोनामुक्त करु असा विश्वास सरपंच संतोष राऊळ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!