◾पु .प्रा.शाळा घावनळे नं 1मद्धे चोरी ; घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांची कोकण लाइव ब्रेकींग ला माहिती..
◾शाळेच्या मागील बाजूची खिडकी फोडून शाळेतील lCD TV व शंभर फूट पाण्याचा पाईप अज्ञात चोरट्याने लंपास केला..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴घावनळे, दि-०७ :- गुरुवार दि 6मे रोजी सायंकाळी 5 वा. मुख्याध्यापक फणसेकर मैडम काही कागद पत्र नेण्यासाठी शाळेत आले असता. शाळेत tv व पाईप नसल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी घावनळे पोलिस पाटील रामचंद्र भोई यांना या सन्धर्भात माहिती दिली. पोलिस पाटील भोई लगेच घटनास्थळी दाखल होत. पोलीस स्टेशनला फोनकेला.
सरपंच उपसरपंच जि. प. सदस्य, आबा मुंज याना फोन केला.बरीच गावकर मंडळी घटनास्थळी जमा झाली. घटनास्थळाचे फोटो भोई यांनी बिट आंमलदार श्री चव्हाण यांना पाठवले. सायंकाळी 7.30वा पोलीस श्री टिकेकर व श्री जाधव येऊन घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. साक्षीदार म्हणून उप सरपंच श्री दिनेश वारंग व अध्यक्ष प्रवीण कदम यांनी स्वाक्षरी केली.

