आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने कोरानाची स्वाब चाचणी करणाऱ्या कोविड योद्धांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार – मनसे

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०१ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने कोरानाची स्वाब चाचणी करणाऱ्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धा होऊन काम करणारे कामगार आपल्या जीवाची बाजी लावुन काम करतात.

या कामगारांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सकाळी ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयात जाऊन या कामगारांचा सत्कार केला.

याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, सचिव संतोष कुडाळकर, प्रशांत उपरकर आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!