◾राजापूरात गंगामाईचे आगमन…
◾कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक भक्तगण दर्शना पासून वंचित..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि-१ :- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील उन्हाळे येथे गंगामाईचे आगमन झाले आहे. गुरुवारी रात्री उशीरा गंगामाईचे आगमन झाले असून चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे. गंगामाई राजापूरात अवतरली असली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना दर्शन घेता येणार नाही.

