आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

◾रत्नागिरी जिह्यातील कोराेनाचा मुकाबल्यासाठी सर्वपक्षीय एकत्र हि समाधानाची बाब ; ना. उदय सामंत

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२९ :- रत्नागिरी जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात उतरण्याचे मान्य करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल नामदार उदय सामंत यांनी सर्वपक्षीयाचे आभार मानले आहेत, आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,आमदार राजन साळवी,माजी आमदार बाळासाहेब माने ,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन , मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर ,जितेंद्र चव्हाण, कॉँग्रेसचे रमेश कीर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी कदम, बशीर मुर्तुजा यांच्यासह अन्य सर्वपक्षीय मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वांनी रत्नागिरी जिल्ह्यातील करोना विरूद्धच्या लढ्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, रत्नागिरी महिला रुग्णालयात १६०ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ लागणार असून माजी आमदार बाळ माने यांच्या यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजमधील ४०विद्यार्थिनी महिला रुग्णालयात काम करणार असून त्यांना आता लगेच ट्रेनिंग देण्यात येणार आहे अशी माहिती ना,सामंत यांनी यावेळी दिली, तसेच जिल्ह्यातील खेड दापोली आदी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची देखील मदत घेतली जाणार आहे, परकार नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थी महिला हॉस्पिटल येथे काम करणार आहेत तर वालावलकर रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ त्या रुग्णालयासाठी काम करणार आहेत, वालावलकर रुग्णालयातील दहा डॉक्टराची प्रशासन मदत या कराेना लढ्यासाठी घेणार आहे त्यासाठी प्रशासनाने त्यांचे मानधन पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे असे ना,उदय सामंत म्हणाले,अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली असल्याने आता खऱ्या अर्थाने कोरोनाविरूद लढाई सुरू होईल असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!