आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾गरिबांचा फ्रीज बनवणारे व्यवसायिक आर्थिक संकटात..

 

◾कायम अशीच परिस्थिती राहिल्यास पारंपारिक व्यवसाय बंद करावा लागेल याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-२९ :- उन्हाच्या झळा चांगल्या जाणवू लागले असून उन्हाळ्याची चाहूल लागताच गोरगरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणारे मातीचे माठ बाजारपेठत विक्रीसाठी दाखल होऊ लागले आहेत.

सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे उन्हाळ्यात वाढणार्‍या घामाच्या धारा व वारंवार लागणारी तहान भागविण्यासाठी प्रत्येकजण शीतपेयांना पसंती देत आहे. मात्र शरीराला थंडावा देणाऱ्या व गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरण पूरक मातीच्या माठाला या दिवसात अधिकच मागणी असते. उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी माठाचे पाणी सर्वोत्तम मानले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावातील कुंभार व्यवसायिक माती कामाची परंपरा झोपासत आहेत .येथील माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यात नळ असलेला माठ , साधा माठ तसेच विविध प्रकारचे माठ सध्या विक्रीसाठी ठेवले जातात . काही वर्षांपूर्वी शहरात तसेच ग्रामीण भागात घरोघरी माठ दिसायचे आणि यातील थंडगार पाणी चवदार लागायचे .परंतु माठाची जागा आता फ्रीज ने घेतली आहे. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात दिसणारे माठ कमी झाले आहेत .परंतु फ्रिजमधील पाणी चवदार लागत नसल्याने मातीच्या माठाला मागणी वाढत आहे.यांमागे व्यावसायिकांची रात्रंदिवस मेहनत असते तासन्तास भट्टीवर शेकल्यानंतर खऱ्या अर्थाने गरिबांचा फ्रिज असलेला माठ आकारास येतो काही जुनेजाणते व्यवसाईकाशी बातचीत केली असता ते सांगतात आम्ही पिढ्यानपिढ्या व्यवसाय करत आहोत. परंतु चायना बॉटल तसेच पाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल वाढल्याने प्लॅस्टिकची भांडी त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे .तशी स्थिती राहिल्यास आम्हाला पारंपारिक व्यवसाय बंद करावा लागेल याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!