◾’ऑक्सिजन कमी पडणार हे २५ वर्षांपासून सांगतोय’ ; शौकत मुकादम
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२८ :- २५ वर्षांपूर्वीच पर्यावरणाच्या कार्यक्रमातून सांगत होतो की भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे.ते आज खरं ठरत आहे.कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यावर योग्य नियोजन असणे गरजेचे आहे.मी असे म्हणणार नाही की केंद्र सरकार अपयशी ठरले आहे पण सरकारचे नियोजन चुकले आहे हे कबूल करतो,अशी प्रतिक्रिया माजी सभापती शौकत मुकादम यांनी एका मुलाखतीत दिली.शौकत मुकादम म्हणाले, मोठ्या प्रमाणातील जंगल तोडीमुळे पर्यावरणाचा हास होत आहे.ऑक्सिजनचा प्रश्न आज निर्माण झाला आहे.कोरोनाची दुसरी लाट आली तरी सरकार हातावर हात घेऊन गप्प बसले होते.जर’त्यापूर्वीच योग्य नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती त्यामुळे नियोजनावर श्री.मुकादम यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.ते म्हणाले की आज लसीकरणाची अवस्था बिकट आहे.ग्रामीण भागात ५०० रुपयाचे वाहन करून लस घेण्यासाठी लोक येतात पण त्यांना लस मिळत नाही. मग वेळेपण व पैसा फुकट जातो याला जबाबदार कोण ? आज लसीबाबत ही परिस्थिती आहे तर उद्या १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरणला काय गोंधळ होईल.त्याचा विचार करा दुसरीकडे लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्टर करा,असे सांगितले जात आहे. पण ज्या गावात नेटवर्क नाही त्यांनी काय करावे,त्यामुळे लसीकरणाबाबत आता जोगोधळ होत आहेतोपुढे टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.

