आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

◾सांगुळवाडी – नावळे रसत्याचे झालेले काम दर्जाहीन ; संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी..

 

◾सरपंच गौरी रावराणे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कडे मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-२८ :- सांगुळवाडी -नावळे रसत्याचे झालेले काम दर्जाहीन आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगुळवाडी सरपंच गौरी रावराणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

रावराणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सांगुळवाडी-नावळे रस्ता ई.जि.मा.९ किमीच्या रस्त्यामध्ये ३/१०० ते ४/४०० मध्ये करण्यात आलेल्या डांबरीकरणाचे काम दर्जाहीन आहे.मक्तेदाराने या रस्त्याचे केवळ बीबीएम केले आहे. या रस्त्याला समानता ठेवण्यात आलेली नाही. तसेच सिलकोट व कारपेट होण अपेक्षित असताना ते करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असताना देखील या कामाची पुर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याची पाहणी करून या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगुळवाडी सरपंचांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!