आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट..

 

◾त्यामध्ये रिक्षा व्यावसायिकांचा समावेश ; बँक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैशाची जमवाजमव ; त्यांना करावी लागत आहे तारेवरची कसरत..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-२२ :- लॉकडाऊनमुळे हातावर  पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यामध्ये रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे, बँक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैशाची जमवाजमव करताना रिक्षा व्यावसायिकांनी गेले वर्षभर  तारेवरची कसरत करावी लागत आहे, रिक्षाची  नवीन शोरुम किंमत दोन लाख १५ हजार रुपये चे वर आहे ,तसेच शासनाचा विमा,परमिट, पासिंग सह,अन्य शुल्कात वाढ केल्याने रिक्षा व्यवसायांचे अतोनात नुकसान होत आहे तर पेट्रोल ,ऑइल ,टायर त्यांचे वाढते किंमती भरमसाठ वाढ होत असून कंबरडे मोडले आहे.

अनेक तरुणांनी  नाईलाजास्तव  आता  पावले रिक्षा व्यवसायाकडे वळविली आहेत.  रिक्षाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे,

रिक्षा खरेदी करण्यासाठी घेतलेले बँकेचे कर्ज व आता वर्षभर सुरु असलेली लॉकडाऊन यामुळे पैशाची जमवाजमव करताना रिक्षा व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्षा व्यवसाय करण्यासाठी तरुणांचा कल वाढला आहे. रिक्षाचालवून स्वतः चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी  या व्यवसायाकडे वळाले असून बसस्थानक , बाजार पेठ, या ठिकाणी मिळणारी छोटी मोठी भाडी सुध्दा बंद झाली आहेत. एसटी बस स्थानक  बंद झाली, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रवासह बंद, प्रवासी बाजारात येत,नसल्याने रिक्षाचालक पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे.दिवसभरात 200 ते -300 रुपये भाडे मिळून पेट्रोल, रिपेरिंग (मेन्टेनन्स)  खर्च भागवून हातामध्ये शिल्लक राहणाऱ्या पैशातून घरखर्च भागविला जातो तसेच बँकेचे हप्ते भरायचे कसे या विवेंचनात रिक्षा चालक अडकले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानाधारक रिक्षा व्यावसायिक यांना पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले होते वास्तविक लाँक डाऊन कालावधीसाठी सदरची रक्कम अगदी तुटपुंजी असली तरी आश्वासक सहकार्याची होती. या अपेक्षेने रिक्षा व्यावसायिक यांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी सर्व रिक्षा व्यावसायिकांनी कडून केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!