◾आठवडी बाजार बंद असल्याने ग्रामीण अर्थकारण संकटात..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि-२२ :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक करताना अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत .आठवडी बाजार भरत नसल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला व ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे मागील वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता .मात्र मागील महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढला असून आता कोरोनाने ग्रामीण भागालाही विळखा घातला आहे .हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक कडक संचारबंदी सुरू केली आहे .यात आठवडा बाजार पूर्णता बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता गावठी आठवडी बाजार बंद असल्याने अशा बाजारांवर कुटुंबाचा चरितार्थ चालवणारे व्यवसायिक किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली आहे .या आठवडी बाजारावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे काही शेतकरी उकडे तांदूळ, केरसुनी, गावठी भाजीपाला, फणस ,आंबे, ओले काजुगर याची विक्री करून उदरनिर्वाह चालवतात दरम्यान आठवडी बाजार बंद असल्याने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांचे इतर छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले असून ग्रामीण अर्थकारण संकटात सापडले आहे.

