आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾कसाल येथे युवतीची गळफास लावून आत्महत्या..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि-२१ :- कुडाळ तालुक्यातील कसाल केळुसकरवाडी येथील विद्या विक्रम पवार वय १६ वर्ष या युवतीने राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर आपल्या रूममध्ये ती झोपायला गेली होती. सकाळी ती आपल्या रूममधून बाहेर न आल्याने नातेवाईकांनी रूममध्ये पाहिले असता ती आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही . ती नववीत शिकत होती .याबाबत ओरोस पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!