आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीय

◾उद्योजक प्रकाश देशमुख यांच्याकडून चिपळूण नगर परिषदेच्या डॉक्टर्सना पीपीई किटचे वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण,दि-१७ :- येथील उद्योजक,मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रकाश दादासाहेब देशमुख यांनी चिपळूण नगर परिषदेच्या डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करुन सामाजिक दायित्व पुन्हा एकदा जपले आहे. गेल्या वर्षी देखील कोरोना सुरू झाल्यानंतर श्री. देशमुख यांनी गरजूंना ५०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

गेल्या वर्षी कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर शासनाने लॉकडाऊन लागू केले होते.यामुळे सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले होते. याची दखल घेऊन हॉटेल अतिथी चे मालक व प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनीरिंग कंपनीचे संचालक प्रकाश देशमुख यांनी स्वखर्चातून गरजूंना ५०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काही पावले उचलली होती. यामध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर श्री देशमुख यांनी देखील पुढाकार घेऊन तीन लाख देऊन सहकार्याचा हात दिला होता. त्याची दखल घेऊन प्रशासनाने २६ जानेवारी रोजी प्रकाश देशमुख यांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार केला होता.

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा वेग मंदावला होता. मात्र, आता पुन्हा कोरोनाने हाहाकार माजण्याची सुरुवात केली आहे. यामुळे शासन प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोनाच्या लढाईविरोधात आपला सहभाग असावा या स्वच्छ हेतूने प्रकाश देशमुख यांनी चिपळूण नगर परिषदेतील डॉक्टर्सना नुकतेच पीपीई किटचे वाटप करून सामाजिक दायित्व जपले आहे. या उपक्रमाबद्दल प्रकाश देशमुख यांचे चिपळूण नगर परिषदेने आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!