तहसिल कार्यालयातील रद्द केलेली आयटी असिस्टंट पदे पुन्हा भरावीत

सावंतवाडी दि.११:- संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सहाय्य योजनांच्या अंमलबजावणी करीता प्रत्येक तहसील कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या आयटी असिस्टंट यांची रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा एकदा भरण्यात यावी अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर शासकीय योजनांच्या कामासाठी तब्बल 419 आयटी असिस्टंटची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शासनाने नुकतीच ही पदे रद्द केल्याने संबंधित यंत्रणेवर मोठा ताण येत आहे शासन निर्णयाप्रमाणे विशेष सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत असलेल्या योजनांची संगणकीय कामे पार पाडण्यासाठी व इतर संगणकीय कामकाज करणेकामी तालुकास्तरावर एक व जिल्हास्तरावर एक याप्रमाणे आयटी असिस्टंट ची नियुक्ती केलेली आहे सद्यस्थितीत संजय गांधी योजनेच्या आस्थापनेवरील पदे मोठ्या प्रमाणात व्यापगत झालेली आहेत शासनाकडून सदरची पदे आजतागायत पुनरुज्जीवित केलेली नसल्याने उपलब्ध यंत्रणेवर मोठा परिणाम होत आहे त्यातच शासनाकडील पत्रान्वये आयटी असिस्टंट यांच्या सेवा दिनांक एक एप्रिल 2019 पासून रद्द करण्यात आल्याने विशेष सहाय्य योजनांच्या अंमलबजावणीचा कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरची पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी श्री तळवणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!