◾बांद्याचा आठवडा बाजार रद्द ; अन्य दुकाने मात्र सुरु राहणार ; बांदा व्यापारी संघाची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा,दि-११ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांद्याचा सोमवार आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. बाजारपेठेतील अन्य दुकाने मात्र रात्री ८ वाजेपर्यंत सुरळीतपणे सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बांदा व्यापारी संघाने दिली.शासन निर्णयानुसार बांद्यात शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. दवाखाने, मेडिकल व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.
सोमवारी भरणारा आठवडा बाजार कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य दुकाने मात्र सुरळीतपणे सुरु राहणार आहेत. ग्राहकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करुन बाजारपेठेत खरेदीसाठी येण्याचे आवाहन व्यापारी संघामार्फत करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच अक्रम खान, संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, खजिनदार मंगलदास साळगावकर, ग्रा. पं. सदस्य साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, बांदा मराठा समाज अध्यक्ष बाळू सावंत, राजा सावंत, गुरुनाथ सावंत, व्यापारी भाऊ वळंजू, सर्वेश गोवेकर, सुरेश पावसकर, अभय सातार्डेकर, राकेश केसरकर, आनंद कल्याणकर आदी उपस्थित होते.