खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे आयोजित योग एक साधन याविषयी प्रबोधन
🖥️ Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴खारेपाटण : दि. ०८ मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे आयोजित “योग एक साधन” या विषयी प्रबोधन करताना “आसने आणि प्राणायाम यापुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. योगशास्त्र मानवी जीवनाला हिऱ्याप्रमाणे पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवते. म्हणून प्रत्येकाने योगाभ्यासक बनायला हवे. योग ही अशी निरंतर प्रक्रीया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते.” असे प्रतिपादन प्रा. प्रकाश शिंदे यांनी केले.
जवळपास पाच हजार वर्षांहून अधिक मोठी परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे कारण आपलं शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात.केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच बऱ्याच वेळेला आपण योग समजत असतो. मात्र, तसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे, असे ही मत त्यांनी व्यक्त केले.
व्यायामाकडे दुर्लक्ष, बैठी जीवनशैली, मानसिक व शारीरिक ताणतणाव आणि अनियंत्रित आहार वगैरे कारणांनी अनेकजण विविध आजारांची शिकार होत असतात. म्हणून योग ही साधना असून सर्व स्तरांवर तंदुरुस्ती, वजनात घट, ताण तणावा पासून मुक्ती, अंर्तयामी शांतता, रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, सजगतेत वाढ, नाते संबंधात सुधारणा, उर्जा शक्ती वाढते, शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते, अंतर्ज्ञानात वाढ इत्यादी वरून योग ही एक साधना असे म्हणने वावगे ठरणार नाही.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा खारेपाटण महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.वसीम सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रकाश शिंदे, प्रा. रश्मी देसाई, प्रा. डॉ. वंदना शिंदे – व्हटकर, प्रा. तानाजी गोदडे, प्रा. गजानन व्हंकळी, प्रा. नयन ऊगले, प्रा. अक्षता मोंडकर, प्रा. मंगल परब, प्रा. माधवी पांचाळ, प्रा. प्रतिक नाटेकर, प्रा. रोहिणी मर्ये, प्रा. मानसी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधी अरूणा कोकाटे व तुषार जाधव आदी ११९ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रीय सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वसीम सय्यद यांनी केली, पाहुण्यांची ओळख तुषार जाधव तर आभार प्रदर्शन अरूणा कोकाटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रश्मी देसाई यांनी केले.

