झुंजार मित्रमंडळ खारेपाटणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्व्हिस रोडवरील चर बुजविला…
🖥️ Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴खारेपाटण : दि. ०८ बॉक्सवेलच्या मुख्य व प्रवाशांची सतत वर्दळ असणाऱ्या सर्व्हिस रोड वर खोदून ठेवण्यात आलेली चर ही प्रवाशांना त्रासदायक ठरत होती. गेले महिनाभर या खोदून ठेवलेल्या चरीचा त्रास गेले कित्येक दिवस प्रवाशी व नागरिक सहन करत होते. या धोकादायक चरीची दखल घेऊन खारेपाटण येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या “झुंजार मित्रमंडळ खारेपाटणच्या” कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही चर बुजविण्याचा निर्णय घेऊन शेवटी बुधवारी आपल्या मंडळाच्या वतीने खर्च करून या चरी मध्ये काँक्रीटीकरण करून ही चर बुजवली. या त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या वेळी मंडळाचे अध्यक्ष – संकेत शेट्ये, गोट्या कोळसुलकर, भूषण कोळसुलकर, आदिनाथ शेट्ये, अजय भडाळे, दिगंबर राऊत, प्रज्योत मोहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्राथमिक माहिती नुसार ही चर खोदून कोणतीतरी केबल लाईन जमिनीखालून नेण्यात आली होती परंतु ही लाईन नेण्यासाठी खोदण्यात आलेली चर ही योग्य प्रकारे न बुजवता ,चर खोदाईमुळे वर आलेली खडी ही सर्वत्र पसरली होती त्यामुळे प्रवासी हा या खडीवरून जीव मुठीत घेऊन गाडी चालवायला लागत होती या खडीवरून गाडी स्लिप होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात होता.दुसरी गोष्ट म्हणजे या चरी ची उंची जास्त असल्याने येथे खड्डा पडला होता त्यामुळे येणारे वाहन या खड्यातून जाताना मोठ्या प्रमाणात आदळत आहे.त्यामुळे ही सर्व्हिस रोड वर पाडण्यात आलेली चर ही अपघाताला आमंत्रण देत होती.
खारेपाटण एक महत्वाची बाजारपेठ म्हणून दशक्रोशीत प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटणमध्ये दिवसभरात आजूबाजूच्या गावातील शेकडो नि लोकं बाजार, खरेदी अन्य कामांसाठी येत असतात. त्यामुळे खारेपाटण बाजारपेठ प्रवेशद्वार रोड ,वरचा स्टँड रोड, बसस्टँड, खारेपाटण मच्छिमार्केट असे सर्वच रोड प्रवासी, ग्राहक, नागरिकांनी गजबजलेले असतात. सतत लोकांची वर्दळ या रस्त्यावर चालू असते, असे असताना हे रोड कायम निर्धोक असणे गरजेचे आहे.

