आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

शाळा क्र. ३ हस्तांतर व स्थलांतर करण्याचा प्रयत्न, नितेश राणे यांची भेट घेत निवेदन

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०८ येथील शाळा क्र. ३ हस्तांतर व स्थलांतर करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र सर्वांना एकत्र घेवून योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी आज दिली.

कणकवली ओम गणेश बंगल्यावर गुरुवारी शाळा बचाव समितीच्या वतीने आम. नितेश राणे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी माजी. जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, सभापती मनोज रावराणे, अण्णा कोदे, बचाव समितीचे संजय मालंडकर, दिलीप मालंडकर, पपी गवळी, अनिल अणावकर, सदानंद राणे, भैय्या आळवे, नंदू वाळके आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हंटले की, आमचा देवस्थानला विरोध नाही? शाळा तिथेच राहुदेत ही आमची भूमिका आहे. तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली ही प्राथमिक शाळा आहे. शहरात अनेक शाळा बंद पडल्या आहेत. शाळा बंद कराण्याचा हा घाट असून आम्हाला विश्वासात न घेता मनमानी कारभार चालू असून आमचा याला विरोध आहे.

शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षात विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळेच ही शाळा आहे, तिथेच रहावी अशी आमची भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!