आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

शासन निर्णयांची अमंलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात येऊ नये – नितेश राणे

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०८ सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वावरावर अनेक बंधने घातली असून, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाच्या कडक निबंधांमुळे लहान – मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षभरात कोलमडलेल्या आर्थिक स्थितीमुळे व्यावसायिकांसमोर कर्जाचे डोंगर उभे राहीले आहेत.

या परिस्थितीतून मानवतेच्या दृष्टीने विचार करून मार्ग काढणे अत्यंत जरूरीचे आहे . सद्या शासन नियमांची अमंलबजावणी करत असताना व्यापारी वर्गावर सक्ती केली जात आहे. त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे.

तरी शासन निर्णयांची अमंलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!