आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

दिवंगत ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०८ दिवंगत ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोविड काळात रक्ताची गरज ओळखून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गतर्फे शुक्रवार ९ एप्रिल रोजी, सकाळी ९ वा. बौद्धविहारमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड परिस्थितीत रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्याची आणि रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज असते.

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गने ही गरज लक्षात घेऊन दिवंगत उत्तम पवार यांच्या जन्मदिनानिमित्त हे रक्तदान शिबीर होणार आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या दात्यांनी नाव नोंदणीसाठी डॉ. अशोक कदम (९४२२३७३५९०), संदेश कदम, राजा कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!