◾कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कसाल येथील गुरुवारी आठवडा बाजार रद.
◾नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे ; उपसरपंच दत्ताराम सावंत
🖥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴 कसाल,दि-०७ :- गावात कोरोना महामारी संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कोरोना नियम शासन आदेशानुसार कसाल गावातील गुरुवारी आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत यांनी केले आहे. कोरोना महामारी चे वाढते संक्रमण लक्षात घेता प्रत्येक शासनाच्या सूचनांचे तसेच जमावबंदी नियमांचे पालन करून सहकार्य करावे. तसेच शनिवार ,रविवारी लोकडाऊन असून नियमानुसार फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. गुरुवारी आठवडी बाजार बंद असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. शहरातील यांची सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत यांनी केले आहे.

