व्यापारी, गोर – गरीब जनता आणि शेतकरी यांच्याकडुन तीव्र संताप…
◼️ सरकार करतंय कोरोनाच्या नावाखाली जनतेचा छळ…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴सिंधुदुर्ग : दि. ०७ छोटे व्यापारी, गोर – गरीब जनता आणि शेतकरी यांच्याकडुन सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच कारण म्हणजे, जिथे व्यापार करतो तेथील दुकानांचे भाडे, लाईट बिल हे भरणार कुठुन? एक शेतकरी शेतातील माल विकायला ग्रामीण भागातुन शहरी भागात येत असेल. तर पोलिस दांडे घेऊन धमक्या देतात. मग त्या शेतकरी, गरीब, हातावर पोट असणाऱ्या जनतेने असंच उपाशी घरात मरायचं का? कोरोना राहिला बाजुला; उपासमार, कर्ज हेच जनतेला मरणाच्या दारात सोडत आहेत.
घरी कमावणारा एक आणि खाणारे दहा असतील, तर त्यांना पोसणार कोण? सरकार की घरातील कमावती व्यक्ती? घराची घरपट्टी, घरातील लाईट बिल, पाणी पट्टी हे सर्व भरण्यासाठी पैसा लागतो. नुसती आश्वासन देऊन पोट भरत नाहीत. खुर्चीवर बसुन बोलणं सोपं असतं; पण कष्ट करून, मेहनतीने कमाऊन खाणे खुप कठीण असतं.
बँकेंचे हप्ते भरले नाहीत, तर बँकवाले फोन करून त्रास देत असतात. त्यांना आळा घालणार कोण? पैसे नाही भरले तर धमकी दिली जाते, मग आत्महत्या करण्यापलीकडे काय मार्ग आहे. असे प्रश्न आज संतप्त जनता करत आहे.
आधी जेवणासाठी अन्न, राहण्यासाठी घर, लाईट बिल, दुकान भाडे, बँकांचे कर्ज असे अनेक गोर – गरीब जनतेचे प्रश्न सोडवा. मग वाटेल तितके दिवस – महिने बंद ठेवा.
या सर्व बाबी लक्षात घेऊन, सरकारने आणि प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा. जनतेला न्याय मिळवुन द्यावा.

