कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾काजू उत्पादनात कमालीची घट ; काजूला १५० रुपये प्रति किलो दर मिळावा ; काजू बागायतदार यांची मागणी..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-०४ :- भात शेतीला पर्याय म्हणून काजू शेतीवर भर देणारे शेतकरी गेल्या दोन वर्षापासून काजूचा दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. यंदादेखील काजू १०० रुपये प्रति किलो दर बाजारपेठेत लावण्यात आला असून शेतकऱ्याला किमान १५० रुपये प्रति किलो दर मिळावा अशी बागायतदार यांची मागणी आहे लांबलेला पाऊस व उशिरा सुरू झालेली थंडी याचा विपरीत परिणाम कोकणातील प्रमुख पीक असणाऱ्या काजू पिकावर परिणाम झाला आहे .अवकाळी पावसामुळे मोहर कुजून गेल्याने यावर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. याचबरोबर काजू बी खरेदी दरात मोठी घसरण होत असल्याने काजू उत्पादक शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे पीक म्हणून काजू शेतीकडे पाहिले जाते. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे बहुतांश अर्थकारण काजू पिकावर अवलंबून असते काजू उत्पादक मनासारखे आले तर बँकेचे कर्ज दुकानदार यांची देणे उधारी शेतीची मशागत विविध प्रकारची बियाणे घरबांधणी यासारखी महत्त्वाची कामे मार्गी लावू शकतात मात्र गेली दोन वर्षे या पिकावर नैसर्गिक संक्रांत आहे काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत भात शेतीला काजू पीक पर्याय ठरेल काजूला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी भात शेती बरोबरच तसेच काजू बागायतीवर प्राधान्य दिले .मात्र गेल्या दोन वर्षात काजू बीला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या वर्षी नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहिल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहिला त्यामुळे काजू झाडांना नवीन पालवी आली मात्र सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने टी माँस्वयुटो किडीचा प्रादुर्भाव वाढून नव्याने आलेली पालवी या किडीने खाऊन टाकली याचबरोबर सातत्याने निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे मोहोर काळा पडून पडून गेला. काजू उत्पादनासाठी आवश्यक सातत्यपूर्ण थंडी न मिळाल्याने याचा परिणाम मोर प्रक्रिया आणि फळधारणेवर झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोहराचा फुलोरा येण्यापूर्वीच काजू कलमांना रोगाची लागण झाली तसेच वारंवार मोरं वखार पडल्याने काजूच्या झाडाखाली सादर पसरावी तसा काळाकुट्ट मोर गळून पडल्याचे चित्र दिसून आले मोरावर खार पडल्याने अचानक उष्मा वाढल्याने काजू सुद्धा काळे रंगाचे डाग दिसत आहेत काजूला किमान १५० रुपये प्रति किलो चे पुढे भाव मिळायला हवा असे बागायतदार यांचे म्हणणे आहे .

काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवत आहेत ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस ,अतिवृष्टी ,वाढती मजुरी ,पडलेल्या अथवा पाढवलेला दर या सर्वांशी संघर्ष करत स्वाभिमानाने शेतकरी उभा आहे .मात्र नैसर्गिक गोष्टी सामना करताना तो थकून जात असल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे.

दारामध्ये यावर्षी काजू बीला सुरुवातीला प्रति किलो १५० रुपये भाव मिळाला मात्र काजूबी आवक वाढतच दरात वेगाने घट होऊ लागली सध्या हा दर १०५ रुपये किलो पर्यंत खाली आला असून पुढील काही दिवसात हा दर १०० रुपयांच्या खाली येण्याची भीती आहे. शासनाने काजू बी खरेदीसाठी हमी भाव ठरवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!