Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी भटवाडी परीसरातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०४:- येथील भटवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी गळफास लावलेल्या स्थितीत त्यांच्याच घरात आढळून आला. भूपा उर्फ भूपेंद्र गावडे (वय ४२), असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबतची माहीती माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर यांनी दिली. गावडे हे चालक म्हणून व्यवसाय करीत होते. त्याच्या पश्चात मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली?, याबाबत अधिक माहीती कळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!