कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾उंबर्डे मेहबूब नगर मुंबई मंडळाचे सचिव श्री मोहम्मद हसन पाटणकर यांचेकडून उंबर्डे विद्यालयाला शैक्षणिक साहित्य भेट..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-०४ :- उंबर्डे मेहबूबनगर मुंबई मंडळाचे सचिव श्री मोहम्मद हसन पाटणकर यांनी माध्यमिक विद्यालयाला शैक्षणिक साहित्य भेट दिले आहेत श्री पाटणकर हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत विद्यालयाला मदत केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप दळवी यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार मानले.

यावेळी श्री पाटणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडताना विद्यालयाचे ऋण व्यक्त केले या विद्यालयाने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडविले आहेत शाळेचे माजी विद्यार्थी देशात परदेशामध्ये उच्च पदावर काम करीत आहेत उज्वल यशाची परंपरा हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे ही परंपरा पुढे कायम राहील असा माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्याला विश्वास आहे.

गरीब गरजूंना शैक्षणिक मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.अध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करावा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही असे सांगितले.

अध्यक्ष श्री प्रदीप दळवी यांनी पाटणकर यांच्या कार्याचा आढावा घेतला लोकडाऊन च्या काळामध्ये मुंबई मध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना केलेली मदत ही खरोखरच गौरवण्यासारखीच आहे.पाटणकर यांसारखे अनेक माजी विद्यार्थी उभे राहिल्यास शाळेचा कायापालट होईल यामध्ये दुमत नाही असा विश्वास व्यक्त केला.

तसेच मुख्याध्यापक श्री बोबडे सर,एपीजे अब्दुल कलाम पतसंस्थेचे अध्यक्ष श्री गौस पाटणकर यांनी विचार मांडले यावेळी उमर रमदुल, हाजी सलीम पाटणकर ,अलीबा बोथरे, बाबा दळवी उपसरपंच दशरथ दळवी,अनिल पाटील सर, जावेद पाटणकर, यासीन बोबडे , महंमद हुसेन बोबडे, महमूद बोबडे, भिकू जेठी, पाटील सर, कांबळे सर राजाराम हिरोजी, सुखदेव कोळी, पवार मॅडम, वाघमोडे सर, राठोड सर, गजानन गवस, नाईक सर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री एस के राठोड यांनी तर सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!