कणकवलीतील प.पु.भालचंद्र महाराज संस्थानला अधिकच्या जागेसाठी आणि मालवण नगरपरिषदेला मत्स्यालय व अँक्वारीयम साठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देणार”
*महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांची जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभव नाईक आणि शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांना ग्वाही*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*रविकांत जाधव*
*🎴 कणकवली:*
प.पु.भालचंद्र महाराज हे समस्त महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने कणकवलीतील आश्रमात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. या गर्दीचा विचार करता भाविकांना अधिक सोयीस्करपणे भालचंद्र बाबांचे दर्शन होण्यासाठी आश्रमाला अधिक जागेची मागणी संस्थानकडुन आणि समस्त भाविकांकडून नेहमीच होत आली आहे.
जिल्हा परिषदेच्या जि.प.शाळा नं.3 ची आणि नगरपंचायतीची जागा संस्थानला देऊन शाळेला पर्यायी जागा जुन्याच जागेच्या जवळच 20 ते 50 मिटर दरम्यान उपलब्ध करुन शाळेची इमारत बांधुन द्यावी आणि यासाठी भरगोस निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची MSRDC ऑफिस मुंबई येथे संबंधित अधिकारी व भालचंद्र महाराज संस्थानचे प्रतिनिधी यांच्यासह भेट घेतली.
“प.पु.भालचंद्र महाराज हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या पुण्याच्या कामासाठी कणकवली नगरपंचायत व जिल्हा परिषद यांचे देखील सहकार्य घेऊन हि संस्थानची मागणी पुर्ण करणार असल्याचे देखील श्री.नाईक व श्री.पारकर यांनी सांगितले.
या महत्वाच्या बैठकीत मालवण नगरपरिषद क्षेत्रामधे मत्स्यालय तसेच म्युनिसिपल प्लाझा कम फिश अक्वेरियम उभारणीसाठी आणि पालिकेतील अन्य नियोजित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांनी केली.
या दोन्ही मागण्यांची त्वरीत दखल घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी “कणकवली भालचंद्र महाराज संस्थान साठी 20 गुंठे जागा उपलब्ध करुन शाळेची सुसज्ज ईमारत देखील बांधुन देण्याचे तसेच मालवण नगरपरिषद क्षेत्रातील मत्स्यालय आणि इतर सर्व विकासकामे मार्गी लावणार,” असे आश्वासन श्री.नाईक व श्री.पारकर यांना दिले. तसेच या कणकवली व मालवण शहरातील दोन्ही महत्वाच्या कामांच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना तसे प्रस्ताव त्वरीत सादर करण्यास सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासोबत नगरविकास प्रधान सचिव भुषण गगराणी, सचिव महेश फाटक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे खाजगी स्विय सहाय्यक खतगावकर, कणकवली CEO वैभव साबळे, भालचंद्र आश्रम संस्थानचे प्रतिनिधी प्रविण पारकर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, मालवण CEO हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीस उपस्थित होते.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

