कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची युवा संघटना बळकट करणार ; सुनिल गव्हाणे

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२३-: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची विद्यार्थी संघटना वाढविण्यासाठी जिल्ह्यातील युवा वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण काम करणार असून, याद्वारे युवा वर्गाला संघटनेशी जोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थांच्या हितासाठी आपण काम करणार असून, युवकांना रोजगार मिळवण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, शफिक खान, अफरोज राजगुरू, याकुब शेख, राजू धारपवार, प्रसाद दळवी, इफ्तिकार राजगुरू, नंदू साटेलकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!