कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◼️पेट्रोल ओतुन जीवे – मारण्याचा प्रयत्न केलेल्या त्या युवकाची सुटका

 

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि-२१ :-  पटवर्धन चौक येथे शनिवारी २० मार्चला हवालदार विश्वजीत परब आणि चंद्रकांत माने यांच्यासह नगर पंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड यांच्यावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या त्या युवकाची सुटका झाली आहे.

कणकवली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला कुडाळ येथील बालसुधारगृहात हजर करून समज देत त्याच्या आई – वडिलांच्या ताब्यात “त्या” संशयिताला देण्यात आले आहे.

दरम्यान तो युवक तापट स्वभावाचा असल्याचे आई – वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. घरातही कुणाचे तो ऐकत नाही.

तो अल्पवयीन युवक कणकवलीत नव्या ब्रिज खाली, चप्पल विकण्याचा व्यवसाय करत असल्याचेही पुढे येत आहे. दरम्यानच्या त्या युवकाच्या विरोधात कणकवली शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

त्याने केलेल्या प्रकाराबद्दल आई – वडिलांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर पोलिसांनी समजेल अशा शब्दात त्याला समज दिल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!