◼️मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली पुलावर अपघात..
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली, दि-२१ :- मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली पुलावर बुलेट दुचाकी आणि कारमध्ये अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
कारचालक महामार्गावरून कोल्हापूरला जात होता. या दरम्यान बुलेट चालक अचानक हायवेच्या मधोमध येवून थांबल्याने, मागून येणाऱ्या कारची त्याला धडक बसली. यात कारचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने दुचाकीस्वाराचे प्राण वाचले.
या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात दाखल झाली नसून, चर्चेतून प्रश्न मिठवण्याचे प्रयत्न चालू आहेत. अपघातस्थळी प्रसन्ना देसाई, मिलिंद केळुसकर, चंद्रशेखर पहुजा, परेश आचरेकर, सुरेश मालविया आदींनी मदत कार्य केले.

