◾ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात बांद्यात निदर्शने..
◾ अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची केली मागणी..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा, दि-२१:- सचिन वाझे प्रकरणी उचलबांगडी झालेल्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र पाठविल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचीन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचे पत्रात नमूद केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी बांदा मंडल भाजपच्या वतीने आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी बांदा कट्टा कॉर्नर चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका सरचिटणीस दादू कविटकर, महिला तालुकाध्यक्ष अपेक्षा नाईक, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, किशोरी बांदेकर, महिला शहर अध्यक्ष अवंती पंडित, तालुका उपाध्यक्ष विकी केरकर, माजी पं. स. सदस्या राखी कळगुटकर, संजय नाईक, मधू देसाई, केदार कणबर्गी, सातार्डे शक्ती केंद्र प्रमुख रविंद्र धुपकर, कार्यकारणी सदस्य ज्ञानदिप राऊळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

