◾ सिंधुदुर्गच्या नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड..
◾ महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार जिल्हयातील सहा खेळाडू..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि- २१:- गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सावंतवाडीचे नेमबाज अतुल नाखरे यांनी २५ मीटर नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. तसेच श्रीया नाखरे हीने १० मीटर पिस्तूल प्रकारात सबयुथ गटात प्रथम क्रमांक मिळवत पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे जिल्हयातील ६ खेळाडू नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅप्टन एस. जे. इजीकल मेमोरीअल महाराष्ट्र स्टेट शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यात साहिश दिगंबर तळणकर (दोडामार्ग) याने सबयुथ गटात १० मी. पीस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६२ गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला. तसेच स्वानंद प्रशांत सावंत याने ३४८ गुण, आयुश दत्तप्रसाद पाटणकर ३४१ गुण तर यश नामदेव तांबे याने ३३२ गुण मिळविले.
त्याचबरोबर १० मी एअर रायफल प्रकारात वैष्णवी गोविंद भांगले (बांदा) हीने सबयुथ गटात ३८१ गुणांची नोंद करत पाचवा क्रमांक मिळविला. तर शार्दुल सुधीर शिरसाट (बांदा) याने ३४८ गुण मिळवीले. या सहाही खेळाडूंची निवड पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तसेच के. एस. एस. आंतर शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. हे सर्व खेळाडू उपरकर शुटिंग अॅकॅडमी सावंतवाडी व बांदा येथे सराव करणारे असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन मिळाले. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शुटींग असोशिएनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

