आरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾ जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या हस्ते वैभववाडी येथे रुग्णवाहिकेचे उद्घाटन..

 

◾ तालुक्याला शववाहीनी मिळावी ही जनतेची मागणी देखील पुढील काही दिवसात पूर्ण करणार ; आ.नितेश राणे

🖥️ Kokan Live Braking News

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

  🎴वैभववाडी, दि- १९:-  येथील ग्रामीण रुग्णालयाची विस्कटलेली आरोग्य यंत्रणा ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मी केलेल्या पाठपुराव्यानंतर वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात नियुक्त झाले आहेत. त्याचबरोबर रुग्णवाहिका, शवागृह व औषध साठा आदी महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तालुक्याला शववाहीनी मिळावी ही जनतेची मागणी देखील पुढील काही दिवसात पूर्ण करणार असा शब्द भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेली रुग्णवाहिका तालुकावासियांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

आमदार नितेश राणे यांनी आमदार फंडातून ही रुग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन वैभववाडी येथे जिल्हा बँक संचालक, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचे संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, भारती रावराणे, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार, बंड्या मांजरेकर, राजेंद्र राणे, राजू पवार, बाळा हरयाण, किशोर दळवी, संजय सावंत, विश्राम राणे, उदय पांचाळ, प्रदीप नारकर, गजानन पाटील, स्वप्निल खानविलकर, संताजी रावराणे, रत्नाकर कदम, सुनील भोगले व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!