◾ जिल्ह्यात होत असलेल्या मोठ्या प्रमाणावर भेडल्या माडाच्या तोडी संदर्भात मनसे पदाधिकऱ्यांनी घेतली वन अधिकारी नारणवर यांची भेट..
◾ हे झाड शेडूल ट्री मध्ये मोडत नसल्याने या झाडांच्या पानाच्या होणाऱ्या मोठ्या वाहतुकीवर आपण कारवाई करू शकत नाही; वन अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१९-: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भेडल्या माडाच्या तोडी संदर्भात आज मनसे पदाधिकऱ्यांनी वन अधिकारी नारणवर यांची भेट घेतली होती. यावेळी हे झाड शेडूल ट्री मध्ये मोडत नसल्याने या झाडांच्या पानाच्या होणाऱ्या मोठ्या वाहतुकीवर आपण कारवाई करू शकत नाहीत. याबाबतचे अधिकार आपल्या हातात नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे.
या झाडाची गणना शेड्युल ट्री मध्ये व्हावी यासाठी आपण परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्ह्यात या झाडाचे प्रमाण ९० टक्के असून, हे झाड खुप उपयोगी असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी अँड.अनिल केसरकर, शहरध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर आदी उपस्थित होते

