◾ सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची उद्या कणकवली तालुका कार्यालयात सभा..
◾ सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे ; सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांचे आवाहन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची सभा उद्या शनिवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या आयोजित सभेला कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील जिल्हा कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी व सदस्य , तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते व कॉंग्रेस प्रेमी नी सोशल डिस्टन्स व मास्क या नियमांचे पालन करून सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांनी केले आहे.

