आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

रवी जाधव यांच्या स्टॉलवरील कारवाई एकतर्फी व सुडाच्या राजकारणातून – माजी नगरसेवक तानाजी वाडकर

◼️मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याविरोधात लवकरच आक्रोश मोर्चाचे आयोजन

◼️जयवंत जावडेकर यांचे निलंबन करून प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी

◼️प्रार्थना सुरु असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांची प्रतिमा हटविल्याने समाजाच्या भावना दुखावल्या

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. १९ नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे एकाधिरशाही पणे वागत आहेत, शहरांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम जावडेकर यांनी केले आहे, रवी जाधव यांच्यावर झालेली एकतर्फी कारवाई आकसापोटी व जातीच्या रंगातून केली गेली आहे, म्हणून आम्ही गप्प बसणार नाही दलितांना एकत्र करून आक्रोश मोर्चा काढून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निलंबित करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ज्या जागेवर रवी जाधव यांचा स्टॉल होता, तो स्टॉल हटवून त्या जागेवर सध्या नगरपालिकेची कचरा गाडी उभी करण्यात आली आहे. म्हणजे दलीत समाजाची लायकी कचऱ्यापेक्षाही कमी केली आहे, असे रवी जाधव म्हणाले.

या वेळी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सुनील पेडणेकर, काँग्रेसचे समीर वंजारी, सोनम जाधव‌आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तानाजी वाडकर म्हणाले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे सावंतवाडी नगरपालिकेत हजर झाल्यापासून सुडाचे व जातीचे राजकारण करत आहेत. रवी जाधव यांना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा समज न देता ही कारवाई करण्यात आली. त्या दुकानात लावण्यात आलेले राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची प्रतिमा कोणतेही शासकीय सोपस्कार पूर्ण न करता. प्रार्थना सुरु असताना, प्राथनेला बसलेल्या बायकांना लहान मुलीला ओलांडून मुख्याधिकारी यांनी काढून जातीय भावना दुखावल्या आहेत, असा आरोप तानाजी वाडकर यांनी केला.

‌‌आमदार दिपक केसरकर यांनी रवी जाधव यांना दोन ओटे देण्याचे मान्य केले होते, मात्र ते ओटे यापूर्वीच दुसऱ्याला दिले गेले होते, याबाबतची माहिती रवी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली .

देशाच्या संविधानात कोणी कुठेही रोजगार करू शकतो, मात्र सावंतवाडी नगरपालिकेने रवि जाधव यांचा सुरू असलेला रोजगार हिरावून घेऊन संविधानाची पायमल्ली केली आहे. असा आरोप वाडकर यांनी केला. जोपर्यंत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगून लवकरच आक्रोश मोर्चा आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी मुख्याधिकारी जावडेकर हे सैरभैर झाल्यासारखे वागत आहेत, त्यांना आपण काय करतो, आपले अधिकार काय, याचे साधे भान सुद्धा नाही, सावंतवाडी शहरात नगरसेवक, भाजप पदाधिकारी, यांची दुकाने डीक्री झालेल्या जागेत सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्याधिकारी दाखवावे असे आवाहन आव्हान सुनील पेडणेकर यांनी दिले.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!