आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

१०० टक्के धनगर समाजाची वस्ती असणाऱ्या वायंबोशी गावाला आतापर्यंत बस सेवा का नाही..?

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴तळेरे : दि. १८ ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व तालुका पदाधिकारी यांनी तालुक्यातील एस. टी. महामंडळासहित, गटविकास अधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडे वैभववाडी ते वायंबोशी आणि कुर्ली ते वैभववाडी एस. टी. बस सेवा चालू करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.

निवेदनात काळे म्हणाले, एस. टी. महामंडळ ’गाव तिथे एस.टी.’ तर मानव विकास अंतर्गत ‘विद्यार्थी तेथे एस.टी.’ असे उपक्रम राबवत असताना. १०० टक्के धनगर समाजाची वस्ती असणाऱ्या वायंबोशी गावाला आतापर्यंत बस सेवा का नाही..? तसेच कुर्ली गाव वैभववाडी तालुक्यात येते की नाही असा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे…? त्याचे कारण असे की महामंडळाची एकही गाडीची फेरी कुर्ली ते वैभववाडी होत नाही असे का….? बाजार निमित्त, शासकीय काम निमित्त, शिक्षणा निमित्त ग्रामस्थ विद्यार्थी कुर्ली ते वैभववाडी रोज प्रवास करत असतात त्यांना या एस. टी. बस सेवेची गरज असताना असे का..? वैभववाडी तालुक्यात एस. टी. जात नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था फोंडा येथे बाजार निमित्त येथे ग्रामस्थ जातात पण शासकीय कामानिमित्त त्यांना वैभववाडीला यावं लागतं याची नोंद घ्यावी.

एकविसाव्या शतकातही वायंबोशी गावातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते ही शोकांतिका आहे. महामंडळ व तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने ताबडतोब यावरती निर्णय करून दोन्ही गावांसाठी एस. टी. बस सेवा चालू करावी, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व वैभववाडी तालुका पदाधिकारी यांनी संबंधित विभागाला दिले.

एस. टी. महामंडळाचे अधिकारी संजय भोवड, नायब तहसीलदार नाईक व पंचायत समिती कार्यालय येथे निवेदन देताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे वैभववाडी तालुका अध्यक्ष गंगाराम शिंदे, उपाध्यक्ष दाजी बर्गे, वैभववाडी शहर अध्यक्ष मनोहर बोडेकर, वैभववाडी तालुका जेष्ठ नागरीक आघाडी अध्यक्ष मारुती शेळके, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अक्षय कुमार शेळके, तालुका युवा सरचिटणीस अजय शेळके, तालुका प्रमुख संघटक स्वप्निल बोडेकर, तालुका संघटक बाबू बाकु शेळके, रमेश मनोहर बोडेकर आदी उपस्थित होते.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!