आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे यांच्यामुळे कणकवली, देवगड आणि वैभववाडी शासकीय रुग्णालयांना नव्या कोऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ऍम्ब्युलन्स

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १८ आमदार नितेश राणे यांच्यामुळे कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील शासकीय रुग्णालयांना नव्या कोऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ऍम्ब्युलन्स मिळाल्या आहेत. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद, मेस्त्री, पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, देवगड मंडल तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिर काझी यांच्याकडे ऍम्ब्युलन्सच्या चाव्या सुपूर्त करत, लोकार्पण करण्यात आले.

देवगड, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात ऍम्ब्युलन्स अभावी रुग्णांचे प्राण धोक्यात येत होते. ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे गंभीर आजारी रुग्णाला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तातडीने हलविणे शक्य होणार आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, नगराध्यक समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरपंचायत बांधकाम सभापती मेघा गांगण, आरोग्य सभापती अभि मुसळे, महिला बालकल्याण सभापती प्रतीक्षा सावंत, नगरसेवक ऍड. विराज भोसले, नगरसेविका कविता राणे, शेतकरी ख. वि. संघ अध्यक्ष विठ्ठल देसाई, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोनू सावंत, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, युवा मोर्चा संघटन सरचिटनिस संदीप मेस्त्री, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, पं. स. सदस्या सुचिता दळवी, कलमठ सरपंच देविका गुरव, राजश्री धुमाळे, डॉ. शिकलगार, डॉ. संजय पोळ, संजना सदडेकर आदी उपस्थित होते.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!