मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – नितेश राणे
◼️त्यांचा हमाम वेगळा असेल, आमचा हमाम वेगळा…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १८ सचिन वाझेला नोकरीत रिइस्टेट करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दबाव टाकला होता. वाझे हा लादेन आहे का? असे विधिमंडळात विचारत मुख्यमंत्री ठाकरेंनी वाझेला पाठीशी घातले. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच वाझेचे गॉडफादर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. वाझेवर ठाकरेंचा राजकीय वरदहस्त असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. सचिन वाझे , परमवीर सिंग ही छोटी प्यादी आहेत. जर आंबानिंच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा फक्त पब्लिसिटी स्टंट असेल, तर हा पब्लिसिटी स्टंट कोणाच्या सांगण्यावरून केला? याचेही उत्तर एन. आय. ए. च्या तपासात येऊन यामागचा असली मास्टरमाइंड उघड होईल असे राणे म्हणाले.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांना नाव घेऊन आरोप करण्याचा सल्ला देणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे आणि आयपीएल बुकी संदर्भात वरून सरदेसाई कनेक्शन असल्याचेही मी नावानीशी सांगितले आहे, हे लक्षात ठेवावे. त्याहीपुढे जात आमदार नितेश राणे यांनी आज ज्या दिवशी वाझेला अटक झाली, त्यादिवशी सकाळी वाझेची काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी भांडुपला संजय राऊत यांच्या आमदार भावाच्या ऑफिसबाहेर काय करत होती ? याचे उत्तर द्यावे अशी गुगली टाकली. राऊत यांनी वसुललमंत्री म्हणत हमाम मे सब नंगे होते है असा टोला लगावला होता. त्याला उत्तर देताना त्यांचा हमाम वेगळा असेल, आमचा हमाम वेगळा आहे. आमची जनतेशी बांधिलकी असल्याचे प्रतिउत्तरही दिले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

