आरोग्यकोकणशासकीय

नवीन ९ रुग्णवाहिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांच्या सुविधेसाठी राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यातील ६ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रास तर ३ ग्रामीण रुग्णालयास देण्यात येणार असून आतापर्यंत जिल्ह्याला २१ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी,पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जि.प.अध्यक्षा संजना सावंत, आमदार वैभव नाईक व संदेश पारकर पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!