कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

अक्षय हंगे आत्महत्या प्रकरणात खाकीला बदनाम करण्याचा कुटील डाव

अगा जे घडलेची नाही..तपासा अंती अतृप्त आत्म्यांचे मनसुबे धुळीस मिळणार

बावळाट येथे आत्महत्या करणाऱ्या सातारा येथील चालक अक्षय बाबू हंगे वय २७ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही पार्टीमध्ये समझोता झाला होता, हा समझोता झाल्यावर त्यांनी त्याची कल्पना ट्राफिक पोलिसाला दिल्यावर ट्राफिक पोलिसांनी त्यांना सावंतवाडी पोलीस स्थानकात जाऊन प्रकरण आपापसात मिटल्या बाबतचा जवाब देण्यास सांगितले होते मात्र या प्रकरणाला अतिरंजित करून खाकी वरच बोट दाखविण्याचा प्रकार घडला आहे. नातेवाईकांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नाही. हा प्रकार म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा आहे असे परिसरात बोलले जात आहे.
सातारा वरून आलेल्या अक्षय सोबत त्याचा मित्र होता, त्यामुळे असा प्रकार घडला असता तर त्याने सुरुवातीला त्याची वाच्यता केली असती मात्र हा आत्महत्या चा प्रकार कसा घडला त्याला कोणते कारण आहे हे त्याचा मित्रच अधिक पणे सांगू शकेल नातेवाइकांनी सातार्‍यात राहून जर अशा प्रकारचा आरोप केला असेल तर तो पोलिसांचे खच्चीकरण करणारा आहे असे बोलले जात आहे, पोलिसांनी जादा रकमेची मागणी केली म्हणून कोणी आत्महत्या केल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही व ज्या खाकीवर बोट दाखविल्याचे खोटे चित्र रंगविले जात आहे.त्या खाकीवर आज पर्यंत कोणीही वाहन चालकाने नाहक त्रास दिल्याची तक्रार आजपर्यंत केली नाही.त्यामुळे हा प्रकार म्हणजे मनाचे काल्पनिक खेळ आहे असे बोलले जात आहे.
अक्षय हंगे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? त्याचा पूर्व इतिहास काय आहे.याचा सखोल तपास झाल्यावर या मागचे खरे रहस्य उलगडणार आहे.मात्र अशा फ्रकरणाची संधी साधून काही हौसे ,गवसे ,नवसे आपली पोळी भाजून घेण्यासाठी खाकीला बदनाम करण्यासाठी पूढे सरसवतात हे या प्रकरणावरून दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!