कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾ अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एका सैनिकाला दहा वर्षाची शिक्षा

 

◾ मालवण येथे घडलेली घटना; चाकूचा धाक दाखवून केलेला प्रकार..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१७:-  चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका सैनिकाला आज येथील जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजूरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.प्रशांत आत्माराम जाधव वय ३७ (मुळ रा.पुणे)असे आरोपीचे नाव आहे. याकामी सरकारी पक्षातर्फे वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. हा गुन्हा मालवण येथे घडला होता.यातील आरोपी लखनऊ बटालियनमध्ये सैनिक आहे.तो सुट्टीनिमित्त घरी आला होता.यावेळी घराच्या परिसरात परप्रांतीय कामगारांची अल्पवयीन मुलगी खेळत होती.यावेळी तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. अशी तक्रार त्याच्या विरोधात देण्यात आली होती.त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.त्यानंतर त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते.आज यावर सुनावणी झाली.तत्पूर्वी पंधरा साक्षीदार तपासण्यात आले.त्यावेळी त्याच्यावर साक्ष असल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात दहा वर्ष व दुसऱ्या गुन्ह्यात दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!