आ. भास्करराव जाधव यांची कलावंताच्या कलेला अशीही दाद
◼️पखवाज वादकाच्या पाठिवर कौतुकाची थाप…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण : दि. १७ खेड मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव हे काल सायंकाळी मतदारसंघातील आंबडस (ता. खेड) या गावी तेथील ग्रामदैवत श्री. गरजाई, वाघजाई, काळकाई मंदिराच्या चौथ्या वर्धापननदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शनासाठी गेले होते. ते मंदिरात पोहोचले तेव्हा स्थानिक वारकरी संप्रदयातील ग्रामस्थांचा हरिपाठ सुरू होता. मंदिरात आपले आमदार आल्याचे पाहून ग्रामस्थ हरिपाठ थांबवत होते. परंतु, अतिशय सुरेल आणि मंत्रमुग्ध करणारा हरिपाठ ऐकून आ. जाधव हेदेखील त्यात रममाण झाले.
त्यांनी ‘हरिपाठ थांबवू नका, तो संपेपर्यंत मी थांबतो’, असे म्हणत त्यांना तो सुरूच ठेवण्यास सांगितले आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास ते हरिपाठ ऐकण्यात हरखून गेले.
हरिपाठ संपला, आगत – स्वागताचा कार्यक्रम झाला, मनोगत झाले आणि कार्यक्रम संपून बाहेर पडत असताना आमदार श्री. जाधव यांनी ‘हरिपाठामध्ये तो पखवाज वाजवणारा मुलगा कोण रे?’ असे विचारत त्याला बोलावून घ्यायला लावले.
ग्रामस्थांनी ‘तो आमचा अजिंक्य आंब्रे, आपल्या शेजारच्या गावातील चिरणीचा.. म्हणत त्याला बोलावून आणले. ‘खूप छान पखवाज वाजवतोस’ अशी दाद देत आ. श्री. जाधव यांनी नाव, गाव, कौटुंबिक पार्श्वभूमी विचारत त्याची चौकशी केली आणि त्याच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली.
आधी मंदिरात बोलताना वारकरी संप्रदायाशी असलेलं नातं सांगणाऱ्या आ. जाधव यांच्या व्यक्तीमत्वाचा एक वेगळाच पैलू अशाप्रकारे समोर आला. कलेला दिलेली दाद आणि अस्सल कलावंताला पारखून त्याचे त्यांनी केलेले कौतुक हा उपस्थित ग्रामस्थांमध्ये चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

