सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे माजी चेअरमन रमेश पई यांचा सत्कार
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी दि.१५ –* सावंतवाडी कंझ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीला पाच लाख ६८ हजार एवढा नफा झाला आहे.संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ व कर्मचारी कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन चेअरमन उमाकांत वारंग यांनी केले.
कंझ्युमर्स सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये संस्थेच्या कारभाराविषयी चेअरमन उमाकांत वारंग यांनी नफ्याची बाजु सांगून संस्थेची दुकाने आर्थिक फायद्यात चालावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले
सावंतवाडी कंझ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ७१ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा आदिनारायण मंगल कार्यालयात कोरोनाचे नियम पाळून घेण्यात आली
यावेळी संस्थेचे चेअरमन उमाकांत वारंग यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले तद्नंतर सभे पुढील विषय पत्रिकेप्रमाणे सभेचे कामकाज घेतले. संस्थेच्या सचिव सौ स्नेहल लठ्ठे यांनी सभेच्या कामकाजाच्या परिपत्रकांचे वाचन केले
या सभेत संस्थेचे ज्येष्ठ माजी चेअरमन रमेश पई यांना शाल श्रीफळ देऊन चेअरमन उमाकांत वारंग यांनी सत्कार केला. यावेळी माजी चेअरमन रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, ऑडिटर श्री. शिरोडकर, संचालक प्रमोद गावडे, सदानंद चव्हाण, मनीष दळवी, देविदास इंगळे, श्रीमती कमला मेमन, शशिकांत नेवगी, श्री शिरोडकर, श्री. पनवेलकर आदी उपस्थित होते
सदरील सभा उपस्थित सदस्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी उपस्थित सर्व सभासदांचे आभार व्हाईस चेअरमन लक्ष्मीकांत पणदूरकर यांनी मानले
सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे कामकाज आणि आर्थिक परिस्थिती प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत असे चेअरमन उमाकांत वारंग यांनी सांगितले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

