प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने कोव्हीड योध्दांचा गौरव…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १५ कोरोनाच्या महामारीत आपल्या कर्तव्यापासून तसूभरही न हटणाऱ्या शिरवल गावातील योध्यांना प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या संकल्पनेतून तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोव्हीड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या शिरवल गावातील कोव्हीड योध्याना प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन तहसिलदार रमेश पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने या कोव्हीड योध्याचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना संदीप चौकेकर म्हणाले की, मी शिरवल गावचा सुपुत्र आहे. गावातील ग्रामस्थांना कोव्हीड सारख्या महामारीत मदतीचा हात देणे हे माझे कर्तव्य आहे. त्याच वेळी ज्यांनी कोव्हीड काळात उत्कृष्ट कार्य केले त्यांचा प्रातिनिधीक सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणेही आवश्यक आहे. याच भावनेतून कोव्हीड योद्द्यांचा सत्कार केला आहे. शिरवल गावात भविष्यात आरोग्य शिबीर भरवण्याचा मानस असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव पुढे असेन.

यावेळी कोव्हीड काळात अविरत रुग्णसेवा करणारे डॉ. दिलीप घाडी, पोलीस पाटील विजय शिरवलकर, तलाठी सौ.ठाकूर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, गट प्रवर्तक याना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!