आणखीकोकणराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

नम्रता बचतगटाच्या सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रभाग क्र. ६ मधील कार्यतत्पर नगरसेविका सुमन संदेश निकम यांचे आभार मानले…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले : दि. १२ कलानगर येथील नम्रता बचतगट कलानगर यांनी ३ वर्षांपूर्वी २०१८-१९ साली न. प. अंतर्गत बचतगट असल्याने न. प. मार्फत ५ लक्ष रुपये लोन घेतले होते. ते त्यांनी नियमित वेळेवर फेडलेले असून, त्यांना व्याजामध्ये जी सवलत मिळत होती. त्यात ३२ हजार ५०० रुपये बँक ऑफ इंडियाने जादा कापून घेतली होती. परंतु बचतगट हा कार्यक्षम व कार्यतत्पर असल्यामुळे त्यांनी सर्व हिशोब करून जादा गेलेली रक्कम बँक मॅनेजरच्या निदर्शनास आणली. परंतु बँकेकडून त्यांना अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांनी या प्रभागातील नगरसेविका सुमन संदेश निकम यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. याबाबत सुमन निकम यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले. त्यावेळी मुख्याधिकारी यांच्या दालनात नम्रता बचतगटाच्या अध्यक्षा, सचिव व खजिनदार यांची मुख्याधिकारी यांच्या समवेत बैठक होऊन बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून सदर जादा गेलेली रक्कम निदर्शनास आणले.

त्यानंतर सुमन निकम यांनी बँक मॅनेजर व मुख्याधिकारी यांच्याकडे २ महिने पाठपुरावा करून जागतिक महिला दिनी विद्यमान बँक मॅनेजर यांनी तात्काळ नम्रता बचतगटाच्या खात्यात ३२ हजार ५०० रुपये वर्ग केले. त्यानिमित्ताने नम्रता बचतगटाच्या सर्व सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे व प्रभाग क्र. ६ मधील कार्यतत्पर नगरसेविका सुमन संदेश निकम यांचे आभार मानले व सत्कार केला.

यावेळी नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, बचतगट अध्यक्षा मार्टिन फर्नांडीस, जॉईसी फर्नांडीस, इदालिन रॉड्रिक्स, मिलाग्रीन फर्नांडीस, पुलामीन फर्नांडीस, नतालीन फर्नांडीस व बचतगट सदस्य आदी उपस्थित होते.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!