आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

कलमठ खालची कुंभारवाडी येथे एका वीज ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित…

◼️भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री यांनी खडे बोल सुनावले…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली : दि. ११ कलमठ खालची कुंभारवाडी येथे एका वीज ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री यांनी खडे बोल सुनावत माघारी पाठवले. महावितरणकडून त्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करून थकबाकी असलेल्या एकूण ​१४ हजाराच्या बिला पैकी अर्धी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच महावितरणच्या पथकाने महिला कर्मचाऱ्यांना सोबत घेत घरात पुरुष व्यक्ती कामावर गेलेले असतानाच अशा प्रकारे त्रास देणे हे कुठल्या नियमात बसते? असा सवाल मेस्त्री यांनी केला.

तसेच तुम्हाला विद्युत बिल वसुलीचे आदेश आहेत की विद्युत पुरवठा खंडित करून जनतेला त्रास देण्याचे आदेश आहेत, असा सवाल करत मेस्त्री यांनी वीज वितरणच्या त्या पथकाची अक्षरशा बोलतीच बंद करून टाकली. हे पथक त्या वीजग्राहकांच्या घराकडे वसुलीसाठी गेले असतानाच संदीप मेस्त्री यांनी त्या वीजग्राहकांच्या घराकडे जात पथकावर प्रश्नांची सरबत्ती केली. एकूण ​१४ हजार पैकी ​४ हजार रुपये वीज बिलाचे भरणा करण्यास संबंधित ग्राहक तयार असताना, अचानक त्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी त्या ग्राहकाला अगोदर नोटीस दिली होती का? असा सवाल मेस्त्री यांनी सहाय्यक अभियंता श्री. राणे यांना फोनद्वारे केला. त्यावर संबंधित अभियंत्यांनी मोबाईलला मेसेज पाठवल्याचे उत्तर दिले. मात्र ग्रामीण भागातील लोकांना इंग्रजीतून पाठवले जाणारे मेसेज वाचता येतात का? असा सवाल संदीप मेस्त्री यांनी केला.

अखेर या वीज ग्राहकांनी दिलेले ​४ हजार रुपये भरून घेत, खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र यापुढे जर कलमठ गावात अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित केला गेला. तर आम्हीही गप्प राहणार नाही, असा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!